भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, शाळकरी मुलांसह 50-55 जणांना चावा……..

ठाणे – भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणार्‍या मुलांवर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. 50 ते 55 जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये 18 शाळकरी विद्यार्थ्यांचा मुलांचा समावेश आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या तीन दिवसात या परिसरात अनेक नागरिकांना चावा घेतला. सोमवारी या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या मुलांना आणि नागरिकांना इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आलं आहे. यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारलं. भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आय जी एम रुग्णालय दाखल रुग्णांवर रेबीजसह प्रतिबंधात्मक इलाज करण्यात आले आहेत. तीन मुलांच्या तोंडाला चावे घेतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे रुग्णालयात पाठविण्यात आले असून रुग्णालयातील सर्व मुलांना वैद्यकीय निरक्षणात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती आय जी एम रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.
भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त
एाक अहवालानुसार जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात आहेत. भारतात जवळपास 36 टक्के लोकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होत असल्याचं धक्कादायक कारणही अहवालात नमुद करण्यात आलंय. हा टक्का यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. रेबीजच्या अनेक प्रकरणांची नोंदच होत नाही. एनिमल बर्थ कंट्रोल नियम 2001 नुसार भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही, त्यांची केवळ नसबंदी केली जाऊ शकते. पण कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याची चूक काय होती? भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कसा सुटणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या राज्यात सर्वाधिक भटके कुत्रे
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात जवळपास 3.5 कोटी भटके कुत्रे आहेत. तर 1 कोटीहून अधिक पाळिव कुत्रे आहेत. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यात सर्वाधिक भटके कुत्र्यांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक घटन
भारतात भटके कुत्रे सर्वाधिक असण्याचं मुख्य कारण म्हणजे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची घोषणा करण्यात आली, पण ही योजना प्रभावीपणे राबण्यात राज्य सरकारं कमी पडतायत. याशिवाय भारतात प्राण्यांच्या आरोग्यसेवा आणि नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नाहीए

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Advertisement