यासिन शिकलकर मानवाधिकार मीडिया
रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा सामाजिक न्याय विधी आघाडी जिल्हा अध्यक्षपदी अँड.बाळासाहेब पाटील साहेब व जिल्हा कार्याध्यक्ष अँड.सत्यवान पाटील साहेब यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी रयत क्रांती संघटना माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झालेले राहुल निकम व रयत क्रांती पक्ष तालुका अध्यक्ष संजय भाऊ धुमाळ यांचा सत्कार रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रवक्ते राहुल बिडवे यांच्या हस्ते करण्यात आला
शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न व आंदोलनात कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतात यासाठी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक विधी आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे या आघाडीमध्ये येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये वकिलांची फौज उभी केली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मात्र साखर कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करतात एफ आर पी कमी दाखवतात रिकवरी चोरतात या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड करण्यासाठी विधी आघाडी काम करेल दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आज फार मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक सुरू आहे दुष्काळजन्य परिस्थिती असताना दुधाचे दर गगनाला न भिडता ते कवडीमोल भावाने विकत घेतले जात आहे या सर्व साखर सम्राट व दुधाच्या पांढऱ्या पेशीतील दरोडेखोर यांना भविष्यात कोर्टात घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक व दूध उत्पादक शेतकरी यांची होणारी मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडणूक थांबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये आम्ही वकिलांची फौज उभी करत आहोत आमचं खळं लुटणाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये कायदा काय असतो हे दाखवल्याशिवाय स्वस्त राहणार नाही
राहुल बिडवे राज्य प्रवक्ता रयत क्रांती संघटना