सोलापूर (प्रतिनिधी ) – पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली सहा वर्षापासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे
जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट ने आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र च्या सोलापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी म्हणून श्रीकृष्ण देशपांडे यांची नियुक्ती केली आहे श्रीकृष्ण देशपांडे हे युवा भारत न्यूज पोर्टल चे संपादक असून यापूर्वी त्यांनी भारतीय माहिती अधिकार, युवा सह्याद्री (दैनिक, मासिक) पत्रकारिता मध्ये माळशिरस तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख या पदावर काम केले आहे.त्यांचा कामाचा चांगला अनुभव असून तसेच त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. सर्वसामान्य माणसांचा न्याय हक्कासाठी देशपांडे यांनी आपली पत्रकारिता पणाला लावून वंचित पिढीत घटका चे प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न करत आहेत.
त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार उप संपादक डॉ आशिष कुमार सुना जिल्हा प्रतिनिधी संतोष म्हेत्रे विकास काळे अकबर मुजावर मोहिते अमर पवार बंडू तोडकर शंकर माने मनोज गायकवाड विक्रम वाघमारे अतुल भडंगे राजाभाऊ पवार शंकर माने अनिल कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.