अकलूज च्या परिवहन कार्यालया चा परिवहन मंत्र्याना पडला विसर एकाच व्यक्ती कडे दोन पदभार अजून असा किती महिने चालणार हा कारभार?October 30, 20230
यासीन शिकलकर अकलूज:- यापूर्वी सोलापूर येथील विजापूर रोड येथे असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माळशिरस सांगोला पंढरपूर मंगळवेढा माढा अक्कलकोट बार्शी सह अन्य तालुक्यातील नागरिकांना दुचाकी तीनचाकी चारचाकी बाबत कच्चा परवाना पक्का परवाना वाहनाचे पासिंग, फिटनेस ,टॅक्स या सह सर्वप्रकारच्या कामासाठी इतर तालुक्यातील नागरिकांना सोलापूर येथे यावे लागत होते सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन नेते व मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे म्हणून प्रयत्न केला होता त्यांच्या मुळे अकलूज येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाले होते
गेल्या अनेक महिन्यापासून अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्याल्यात पूर्ण वेळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्याने या भागातील तालुक्यातील अनेकांची शासकीय कामे रखडली आहेत पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने अनेक कामे ठप्प असल्याचे समजते
एकाच व्यक्ती कडे दोन पदभार अकलूज ला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी का नाही ?
सोलापूर आणि अकलूज परिवहन कार्यालयाचा पदभार एकाच व्यक्ती कडे असून अकलूज च्या परिवहन कार्यालयाचा परिवहन मंत्र्याना विसर पडला का? असा सवाल त्या भागातील नागरिकाना पडला असून अकलूज ला पूर्ण वेळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी का दिला जात नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे
पालकमंत्री चंद्रकांत दादा आता तरी लक्ष घालतील का?
अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी विना चालत असून या भागातील तालुक्यातील अनेक नागरिकांचे आर टी वो संबंधित अनेक कामे रखडली असल्याने अकलूज ला लवकरात लवकरच स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देण्याबाबत सोलापूर चे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष घालावं अशी मागणी आता नागरिका कडून जोर धरू लागली आहे.