बिदर जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. याठिकाणी पोलिसांनी ७८ वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे. यामुळे त्यांना का अटक केली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलीस म्हणाले की त्यांच्यावर चोरीचा आरोप आहे.असे असताना आता त्यांनी ही चोरी कधी केली हे ऐकून सगळेच हादरून गेले आहेत. ही चोरी त्यांनी ६० वर्षांपूर्वी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 1965 मध्ये वृद्धाने दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरले होते. त्याबद्दल त्यांना आता अटक केली गेली.गणपती विठ्ठल वाघमोरे असे त्यांचे नाव आहे. यांच्यावर १९६५ मध्ये चोरीचा आरोप झाला होता. त्यांनी दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरी केले होते. त्या प्रकरणात वाघमोरे मुख्य आरोपी होते. यामुळे याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, वाघमोरेंनी मुरलीधर माणिकराव कुलकर्णींच्या दोन म्हैशी आणि एक रेडकू चोरले होते. कुर्की गावात म्हैशी आणि रेडकू सापडले. त्यांना कुलकर्णींच्या ताब्यात देण्यात आले. वाघमोरेंना अटक करण्यात आली. नंतर न्यायालयाने त्यांना जामीनही दिला.त्यानंतर ते फरार झाले. ते आजपर्यंत कोणाच्या हाताला लागले नाहीत. त्यांच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. पोलीस त्यांना वर्षभरापासून शोधत होते. वाघमोरेंना झालेली अटक अतिशय जुन्या प्रकरणातील आहे.एलपीसी योजनेच्या अंतर्गत ही कारवाई केली जाते. प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेल्या प्रकरणात या योजनेच्या अंतर्गत कारवाई होते. या गुन्ह्यातील इतर सर्वांचे निधन झाले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
Homeकानडी पोलीस गावात घुसले, ७८ वर्षांच्या वृद्धाला अटक; इतिहास समजताच गावकरी हादरले……