यासीन शिकलकर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी
बी टी शिवशरन श्रीपुर प्रतिनिधि
सोलापूर जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्या खांद्याला खांदा लावून गेली पंधरा वर्षे धडाडीने काम करणारे माळशिरस तालुक्यातील राहुल बिडवे यांची रयत क्रांती संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली धडाकेबाज भाषण शैली गाववाड्यातील सामान्य शेतकऱ्याचा पोरगा व कोणतीही सभा असो कोणतेही आंदोलन असो प्रस्थापित्यांवरती आपल्या भाषणातून टीकेची झोड उठवणारे धारदार भाषणातून समोरच्याला सळोकिपळो करून सोडतात त्यामुळे आज रयत क्रांती संघटनेला व सदाभाऊ खोत यांना राज्यात आक्रमक चेहरा पाहिजे तसा मिळाल्याने त्यांच्यावरती आज राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिल्याने सोलापूर जिल्ह्यासह रयत क्रांती संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे
ऊस आंदोलन दूध आंदोलन व मराठा आरक्षण अशा कित्येक आंदोलनामध्ये राहुल बिडवे यांनी सहभाग नोंदवून गाव गड्यातील विस्थापित लोकांचा आवाज आपल्या धडाकेबाज भाषण शैलीतून त्यांनी बुलंद केला त्यांच्यावरती ऊस आंदोलन दूध आंदोलन यासह अनेक केसेस कोर्टात दाखल आहेत या सर्वांची दखल घेत रयत क्रांती संघटनेने त्यांना राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देऊन त्यांचा एक प्रकारे सन्मान केलेला आहे यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष पदी संजय धुमाळ,पक्ष अध्यक्ष राहुल निकम,युवक अध्यक्ष नाना कोळी,सोशलमिडिया तालुका अध्यक्ष रोहित रणदिवे यांची निवड करण्यात आली
गेली अनेक वर्षापासून राहुल बिडवे हे माझ्यासोबत काम करत आहेत तालुकाध्यक्ष पदापासून ते जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केलेले आहे त्यांच्या याच कामाची दखल घेत मी त्यांच्यावरती राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा सदाभाऊ खोत अध्यक्ष रयत क्रांती संघटना