नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून एका विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. महिलेने सातपूर पोलीस स्टेशन समोरच हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरातील एका विवाहित महिलेने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सातपूर पोलीस स्टेशन समोर येत महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या प्रियकराचे नाव टाकून तीने सुसाईड नोटही लिहिली आहे. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करताच सातपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये?
विवाहितेने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, तिचे एका तरुणासोबत प्रेम प्रकरण होते. प्रियकराने प्रेमाचा विश्वास दाखवून महिलेकडून एक लाख रुपये घेतले. त्यामुळे महिलेच्या आई वडिलांनी आणि मुलाने नातं तोडल्याने महिला प्रियकराच्या घरी राहायला गेली. पण प्रियकराची आईने महिलेला तू माझ्या मुलाशी लग्न कर, पण पहिले तुला तुझ्या मुलाला सोडावे लागेल. नंतर प्रियकराकडून मी तुझ्या नावावर घर करतो, अशी बतावणी करण्यात आली. मात्र प्रियकराने विवाहितेला सोडून दिले. प्रियकराने सोडल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Homeनाशिक: प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल, पोलीस स्टेशनसमोरच कापली हाताची नस