आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली.प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या स्वतःच्या ९ वर्षीय मुलाला मारल्याची हृदय स्पर्शी घटना समोर आली आहे. सार्थक रमेश बागुल असे मृत मुलाचे नाव आहे. संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवार असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात एका जंगलाच्या दरीमध्ये १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. मृतदेहावर असलेले कपडे आणि इतर गोष्टींमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली होती. परंतु, खून कोणी आणि कसा केला याचा शोध पोलीस घेत होते. मुलाची अपहरणाची तक्रार देताना आणि मृतदेह सापडल्यावर आईच्या चेहर्यावर रडू किंवा दुःखाची भावना नसल्यामुळे पोलिसांना (police) मुलाच्या आईवर संशय आला होतात्यामुळे पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले होते. मला मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या मदतीने मीच त्याचा खून केला असल्याची धक्कादायक कबुली आईने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रियकर साहेबराव पवार आणि संगीता बागुल यांना अटक करण्यात आला आहे.
Related Posts
कांग्रेस नपाध्यक्ष को कांग्रेसी षड़यंत्र से बचाया भाजपा सरकार ने नपाध्यक्ष के खिलाफ अविश्वास प्रस्ताव हुआ खारिज
- Tamanna Faridi
- August 31, 2024
- 0
Facebook Twitter Pinterest LinkedIn Like WhatsApp Gmail SMS Facebook Messenger Copy Link कांग्रेस नपाध्यक्ष को कांग्रेसी षड़यंत्र से बचाया भाजपा सरकार ने नपाध्यक्ष के खिलाफ […]
हर्षोल्लास के साथ मनाई गई मान्यवर कांशीराम की जयंती
- Tamanna Faridi
- March 17, 2024
- 0
Facebook Twitter Pinterest LinkedIn Like WhatsApp Gmail SMS Facebook Messenger Copy Link हर्षोल्लास के साथ मनाई गई मान्यवर कांशीराम की जयंती वाराणसी। सेवापुरी विकासखंड के […]
पावरलिफ्टिंग राष्ट्रीय प्रतियोगिता में विशांत अवस्थी ने जीता गोल्ड
- Tamanna Faridi
- February 25, 2024
- 0
Facebook Twitter Pinterest LinkedIn Like WhatsApp Gmail SMS Facebook Messenger Copy Link झांसी- गुजरात के सूरत शहर में सम्पन्न हुई नेशनल पावरलिफ्टिंग चैम्पियनशिप में झांसी […]