नेवरे ( ता. माळशिरस)- काही दिवसापूर्वी सरकारकडून सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात होते शाळेतील विद्यार्थ्यांची पट संख्या कमी आहे म्हणून त्या शाळा बंद करून तेथील शिक्षक दुसऱ्या ठिकाणी बदली केली जात होती एकूणच सरकारी शाळा बंद करुन खाजगीकरणाकडे सरकारचा प्रयत्न होता पण सर्व सामान्य नागरिकानी सरकार विरोधी अनेक प्रतिक्रीया व्यक्त झाल्याने, लोक भावनेचा विचार करून येऊ तो निर्णय सरकार कडून मागे घेतला.
इंग्रजी माध्यमा पेक्षा ‘जिल्हा परिषद शाळा’ ही काही कमी नाहीत या शाळेतून शिकलेले विद्यार्थी आज क्लास वन अधिकारी , शिक्षक , सैनिक, उद्योजक, नोकरदार, प्रगतशील बागायतदार, व्यवसायिक आहेत.नेवरे हायस्कूल नेवरे येथील दहावीच्या (एसएससी बॅच २०००-२००१ ) एका माजी विद्यार्थी ने १५ दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत असे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावर जि.प.प्रा शाळा नेवरे येथील शिक्षकांने आपल्या शाळेकडे पण पहा असा विनोदात्मक रिप्लाय देऊन शाळेसाठी प्रिंटर ची मागणी केली होती,त्यास एसएससी बॅच २०००-२००१ ने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जि.प.प्रा शाळा नेवरे मध्ये मुलानं कडून स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्काॅलरशिप परीक्षा इ. परिक्षा ची तयारी खूप चांगली करून घेतली जाते . तसेच शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात .त्यामुळे शाळेतली मुलांचा कला गुणाचा सर्वांगीण विकास होत आहे. आजी – माजी विद्यार्थी च्या मदतीतून शाळेमध्ये उत्कृष्ट ग्रंथालय उभारले आहे. शाळेमध्ये वकृत्व,लेखन, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामूळे विद्यार्थी ची खूप प्रगती होत आहे. शाळेतील मुलानं कडून स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्काॅलरशिप परीक्षा इ.ची तयारी करुन घेण्यासाठी शिक्षक अधिक परिश्रम घेतात यासाठी परिक्षा फॉर्म भरणे, सरावासाठी प्रश्न पत्रिका तयार कारणे ,त्याच्या झेरॉक्स प्रती काढणे , यांची शाळेकडे सोय नव्हती यासाठी शाळेचे खूप पैसे खर्च होत होते, त्यावर उपाय म्हणून शाळेतील हुशार, हरहुन्नरी शिक्षक श्री.सोपनर गुरूजी यांनी शाळेतील माजी विद्यार्थी यांना प्रिंटर साठी देणगी अथवा प्रिंटर ची मागणी केली होती. शाळेतील गुरुजींचे विद्यार्थी साठीचे प्रयत्न व योगदान सर्वश्रुत असल्यामुळे गुरूजी मागणी अन् माजी विद्यार्थी चा प्रतिसाद मिळत नाही असे होणार नाही हे त्यांना माहीत होते.
यापूर्वी ही सन २०२२ मध्ये माजी विद्यार्थी ने (एस.एस.सी. बॅच २०००-२००१) ने जि.प.प्रा शाळा नेवरे ला फळा भेट दिला होता. माजी विद्यार्थी हे नेहमी मदत करत असतात व करतात त्यामुळे गुरूजीनी विनोदत्मक टिप्पणी केली असली तरी आपण पण शाळेचे काही तरी देणे लागतो व आपली पण ती जबादारी आहे यांची जाणिव असल्यामुळे , माजी विद्यार्थी यांनी आज ए सएससी बॅच २०००-२००१ ने दिलेल्या देणगीतून जि.प.प्रा शाळा नेवरे साठी शाळेने प्रिंटर खरेदी केला व झेरॉक्स साठी होणाऱ्या शाळेच्या इतर खर्चावर मात करून शाळेला कायमस्वरुपी स्व: हक्काचा प्रिंटर मिळवून दिला व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास साठी एक पाऊल पुढे टाकले आहे त्यामूळे शाळेतली गुरुजीची जबाबदारी आता खुपच वाढली आहे. त्यांच्या प्रयत्नास यश नक्की मिळेल असा विश्वास माजी विद्यार्थी कडून व्यक्त केला आहे. समाजातील अशा लोकांचे सहकार्य असल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो असे शिक्षकांनी सांगितले
यावेळी ,
लाविते लळा ही, जसा माउली बाळा | मज आवडते मनापासुनी शाळा ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे | मग लोक बोलतील “धन्य धन्य ती शाळा | जी देशासाठी तयार करिते बाळा !” || लाविते लळा ही, जसा माउली बाळा | मज आवडते मनापासुनी शाळा ||
- प्र. के. अत्रे (केशवकुमार)
यांच्या कवितेची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.
एसएससी बॅच २०००-२००१ मधील विद्यार्थी हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख उपक्रमा मध्ये अग्रेसर असतात व राहतील असे मत माजी विद्यार्थी कडून व्यक्त केले आहे या कार्यक्रमासाठी जि.प.प्रा.शाळा नेवरे चे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , शिक्षक वृंद , विद्यार्थी तसेच एसएससी बॅच २०००-२००१ मधील विद्यार्थी उपस्थित होते.
एस एस सी बॅच सन २०००-२००१ यांच्या सहकार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे, व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून मनःपूर्वक शतशः आभार मानले